मनोहर सोनवणे यांच्या कथांना जागतिकीकरणाचा व्यापक संदर्भ आहे. त्यामुळे ‘ब्रँड फॅक्टरी’ला सामाजिक-सांस्कृतिक आशयाची डूब आहे

कथासंग्रह वाचल्यावर वाटतं की, ही माणसं वीसेक वर्षांनंतर पुन्हा भेटतील तर किती बरं होईल. हे ‘ब्रँड फॅक्टरी’चं यश आहे. जगात सतत नवं घडत असतं. तत्त्वज्ञ, इतिहासकार, शास्त्रज्ञ वगैरे मंडळी या परिवर्तनाची आपापल्या परीने शास्त्रीय समीक्षा करत असतात. लेखक शास्त्राच्या पलीकडे जातो आणि वास्तवाची कलात्मक पुनर्रचना करतो; सामाजिक-राजकीय वास्तवाला जीवनानुभवाचा समग्रपणा देतो. सोनावणे यांनी ही जबाबदारी समर्थपणे पार पाडलीए.......